-
आज जन्माष्टमी, भारतीय टेलिव्हिजनवर आता पर्यंन्त श्री कृष्णावर आधारित कथा सांगणाऱ्या अनेक धार्मिक मालिका आहेत. सध्या सुमेध मुदगलकरच्या ‘राधाकृष्ण’या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परंतु या आधी देखील अनेक कलाकारआहेत ज्यांनी श्री कृष्णाची भूमिका साकारली आहे. (Photo-Instagram)
-
सर्वादामन बॅनर्जी यांनी १९९३ साली श्री कृष्णाची भूमिका साकारली होती.(Photo-Instagram)
-
नितीश भारद्वाज यांनी एकदा नाही तर दोनवेळा श्री कृष्णाची भूमिका साकारली आहे. एकदा १९८८ साली 'महाभारत' या मालिकेत आणि दुसऱ्यांदा २००३ मध्ये 'विष्णु पुराण'. (Photo-Instagram)
-
टिव्हीवरचा ‘कृष्ण’ म्हटलं की अजुनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारा गोंडस मराठी चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी. त्याने १९९३ मधील 'कृष्णा' मालिकेत भूमिका साकारली असून त्याच्या या भूमिकेसाठी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. (Photo-Instagram)
-
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'महाभारत' या मालिकेत सौरब राज जैन याने श्री कृष्णाची भूमिका साकारली होती. (Photo-Instagram)
-
सोनी वाहिनीवरील 'सूर्यपुत्र करण' या मालिकेत मृणाल जैन याने कृष्णाची भूमिका साकारली होती. (Photo-facebook)
-
'जय श्री कृष्ण' या मालिकेत मेघन जाधवने श्री कृष्णाची भूमिका साकारली आहे. (Photo-Instagram)
-
सध्या सुमेध मुदगलकरच्या ‘राधाकृष्ण’या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (Photo-Instagram)
-
'द्वारकाधीश- भगवान श्री कृष्ण' आणि 'परमावतार श्री कृष्ण' या दोन मालिकेत कृष्णाची भूमिका विशाल करवाल याने साकारली होती. (Photo-Instagram)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक