-
'बिग बॉस ओटीटी' शो अनेक कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घराबद्दल आणि त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांबद्दल जाणून घेण्याची अनेकांना कायम इच्छा असते.
-
'बिग बॉस ओटीटी'मध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची. दोघांमध्ये जवळीक वाढताना दिसतेय.
-
या शोमध्ये सहभागी झाल्यापासूनच शमिता शेट्टी चर्चेत आहे. त्यामुळेच कदाचित शमिता शेट्टी या शोमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक असेल असं अनेकांना वाटू शकतं. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे.
-
शमिता या शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक नसून ती दुसऱ्या स्थानावर आहे. शमिता एका आठवड्यासाठी ३ लाख ७५ हजार इतकं मानधन घेत आहे.
-
तर या शोमध्ये शमिता आणि राकेशनंतर चर्चेत असते ती म्हणजे दिव्या अग्रवाल
-
दिव्या अग्रवालला 'बिग बॉस ओटीटी' या शोसाठी प्रत्येक आठवड्याला दोन लाख मानधन दिलं जातं.
-
वृत्तांनुसार 'बहू हमारी रजनीकांत' फेम रिधिमा पंडित ही अभिनेत्री 'बिग बॉस ओटीटी' शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
-
रिधीमा शोमधून बाहेर पडली असली तरी चाहत्यांना ती पुन्हा परतण्याची प्रतिक्षा आहे. रिधीमाला एका आठवड्यासाठी पाच लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.
-
तर शोमधून एलिमिनेट होणारी पहिली स्पर्धत उर्फी जावेदचं मानधन दोन लाख ७५ हजार इतकं होतं.
-
तर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचं मानधन एक लाख ७५ हजार इतकं आहे.
-
पंजाबी पॉप सिंगर नेहा भसीन एका आठवड्यासाठी दोन लाख मानधन घेते.
-
बिग बॉस ओटीटी' या शोमध्ये बायसेक्शुअल असल्याचं सांगत मुस्कान जट्टानाने अनेकांचं लक्ष वेधलं होतं. मुस्कानला एका आठवड्यासाठी दीड लाख मानधन मिळतं. (All Photo-Instagram)
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिचा विपरीत राजयोग; ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशिब पालटणार, कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…