-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि 'बिग बॉस १३' चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे.
-
हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे.
-
सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांसोबतच संपूर्ण कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
२००८ सालामध्ये 'बाबूल का आंगन छूटे ना' या मालिकेतून सिद्धार्थने करिअरला सुरुवात केली होती.
-
'लव्ह यू जिंदगी' तसचं 'बालिका वधू' या मालिकांमधून सिद्धार्थने चाहत्यांची मोठी पसंती मिळवली होती. तर 'बिग बॉस १३' मध्ये त्याने प्रेक्षकांचं मन जिंकत विजेतेपदावर नाव कोरलं.
-
सिद्धार्थचे आज लाखो चाहते असले तरी त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी चाहत्यांना ठाऊक नसतील.
-
बिग बॉस १३ मध्ये अनेकांनी सिद्धार्थला आळशी ठरवलं. मात्र प्रत्यक्षात सिद्धार्थ फिटनेस प्रेमी होता. अनेक तास तो जिममध्ये वर्कआउट करण्यात घालवत असे.
-
तसचं सिद्धार्थ क्रिडाप्रेमी होता. शालेय दिवसांमध्ये सिद्धार्थने टेनिस आणि फुटबॉलमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
-
२००५ साली सिद्धार्थ वर्ल्ड बेस्ट मॉडेल ठरला होता.२०१५ मध्ये झालेल्या आठव्या जिओस्पा आणि एशियास्पा इंडिया अवॉर्ड्स मध्ये सिद्धार्थला वेलनेस आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला होता
-
सिद्धार्थाने नुकताच 'सिन्थ ग्लोबल स्पा'चा फिट अँड फॅब अवॉर्ड देखील जिंकला होता.
-
सिद्धार्थ शुक्ला बिग बी अमिताभ बच्चन यांचा चाहता होता. तर 'अग्नीपथ' हा त्याचा आवडता सिनेमा होता.
-
'फास्ट अँड फ्युरियस' सीरिजमधील सर्व सिनेमा पाहणं सिद्धार्थला आवडायचं
-
सिद्धार्थने 'सावधन इंडिया' या क्राईमशोचं होस्टिंगदेखील केलं आहे.
-
सिद्धार्थ शुक्लाने 'इंडियाज गॉड टॅलेंट' या शोमध्ये देखील होस्टची भूमिका साकारली होती. मात्र या शोमध्ये भारती सिंहला अधिक स्क्रीन आणि डायलॉग मिळाल्याने सिद्धार्थ नाराज असल्याच्या चर्चा होत्या.
-
सिद्धार्थ शुक्लाचं त्याच्या सहकलाकार असलेल्या अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. यात अभिनेत्री रश्मी देसाई, पवित्र पुनिया, स्मिता बन्सल, तनिषा मुखर्जी, दृष्टि धामी आणि आरती सिंह या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा होती.
-
सिद्धार्थने मात्र प्रत्येक वेळी या चर्चाना पूर्णविराम देत आपण सिंगल असल्याचं स्पष्ट केलं.
-
सिद्धार्थने 'झलक दिखलाजा' या शोच्या सहाव्या पर्वातही भाग घेतला होता.
-
अभिनयात सक्रिय असणारा सिद्धार्थ सोशल मीडियावर 'बिग बॉस १३' या शोपासून सक्रिय झाला.
-
एका लाइव्ह सेशनमध्ये सिद्धार्थने आपण सोशल मीडियाच्या बाबतीत खूपच अज्ञानी असल्याचं कबुल केलं होतं.
-
18 'बिग बॉस १३'नंतर सिद्धार्थ आणि शेहनाज गिलच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
-
दोघही एकत्रीत एका अल्बममध्ये झळकले होते. या अल्बमला चाहत्यांती पसंती मिळाली होती.
-
'ब्रोकन बट ब्यूटीफुल' हा सिद्धार्थचा वेब शो चांगलाच गाजला.
-
तसचं 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाया' सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. (All Photo-Instagram@sidharthshukla)

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर