-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अभिनयसोबत एक उत्तम बिझनेस सुद्धा करू शकतात. निधी उपक्रम उभारण्यापासून ते स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यापर्यंत, महिला उद्योजीका या सर्वाचे योग्य पद्धतीने नियोजन करु शकतात. येथे काही लोकप्रिय अभिनेत्रींची यादी आहे जी स्वतःच बॉस बेब्स आहेत.
-
गेल्या वर्षी आलियाने 2-14 वयोगटातील मुलांसाठी 'एड-ए-मम्मा' नावाची कंपनी सुरू केली. अभिनेत्रीने स्टाइलक्रॅकर आणि न्याका सारख्या कंपन्यांमध्ये पैश्याची गुंतवणूक केली आहे. प्राणी आणि पर्यावरणीय कल्याणासाठी काम करणारे व्यासपीठ 'को-एक्झिस्ट' देखील सुरू केले आहे. तसंच तिने स्वतःची 'इटरनल सनशाईन प्रॉडक्शन्स हाऊस' देखील लाँच केलं.
-
अनुष्का शर्माने तिच्या भावासोबत 'क्लीन सलेट फ्लिम्झ' नावचं प्रॉडक्शन हाऊस लाँच केलं. तसंच प्राण्यांच्या बचावासाठी अनुष्काने एक मोहीम सुरू केली आहे.
-
२०१५मध्ये दीपिकाने 'ऑल अबाऊट यु' नावाने स्वतःची कपड्यांची कंपनी स्थापन केली. २०१७मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'का एंटरप्राइझेस'या कंपनीची स्थापना केली. वेगवेगळ्या फ्लेवरचे दही तयार करणाऱ्या एपिगामिया तिने गुंतवणूक केली. तसंच 'फ्रंटरो', 'ब्लु स्मार्ट' अशा अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. २०२०मध्ये दीपिकाने 'छपाक' या चित्रपटातून निर्माती म्हणून पदार्पण केले.
-
मॉडेल, डान्सर, फिटनेस क्वीन मलायका अरोराने नुकतीच लाइफस्टाइल आणि आरोग्यासाठी सुरु केलेली स्टार्ट अप कंपनी 'सर्वा' आणि न्यूड बाऊल्स या कंपनी मध्ये गुंतवणूक केली आहे.
-
बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे न्यू यॉर्क मध्ये 'सोना' नावाचे रेस्टरांट आहे. या शिवाय 'अनोमली' नावचा ब्रॅंड देखील तिने स्थापन केलां आहे या ब्रॅंडच्या माध्यमातून नैसर्गिक रित्या केसांसाठीचे प्रॉडक्ट तयार केले जातता. अभिनेत्रीने अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवलेले आहेत.
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे ती 'लोसिस स्पा' आणि सलोन ची को -पार्टन आहे.
-
कतरिना कैफने २०१९मध्ये 'काय ब्युटी' नावाचा मेकअप ब्रँड लाँच केला. (Photos- All Photos Instagram)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..