-    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा समावेश सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्यांमध्ये केला जातो. 
-    अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतात. चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय कुमार त्याच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. 
-    चित्रपटांमधील काम आणि आपले कुटुंब यामध्ये योग्य तो समतोल राखण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचे नाव न चुकता घेतले जाते. 
-    व्यग्र वेळापत्रक असूनसुद्धा तो पत्नी आणि मुलांना पुरेपूर वेळ देतो. 
-    बॉलिवूडमध्ये एक मोठा स्टार असून देखील तो घरी मात्र सर्वसामान्यांप्रमाणेच राहतो. विशेष म्हणजे तो त्याच्या मुलांची काळजी इतर सर्वसामान्यांप्रमाणेच घेतो. 
-    अक्षय व ट्विंकल खन्नाचा मुलगा आरव सध्या प्रचंड चर्चेत आहे. खिलाडी कुमारचा मुलगा आरव कायम दूर राहत असल्याचं दिसून येतं. 
-    अक्षय कुमार हा कामाला प्रचंड प्राधान्य देतो. तो सकाळी लवकर शूटला जातो जेणेकरुन संध्याकाळी त्याला वेळेवर घरी परतता येईल. यामुळे त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यास मिळतो. अक्षय हा मुलांसोबत असतेवेळी सर्वसामान्य वडिलांप्रमाणेच असतो. 
-    अक्षय आणि ट्विंकल या दोघांनाही त्यांच्या मुलांनी पैशाचे महत्त्व समजून घ्यावे आणि अवाजवी खर्च करू नये, असे नेहमी वाटते. 
-    यामुळे जेव्हा अक्षय कुटुंबासोबत सुट्टीवर जातो तेव्हा तो इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करतो. 
-    विशेष म्हणजे अक्षयप्रमाणेच आरवनेसुद्धा मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यात त्याला ब्लॅक बेल्ट मिळाल्यानंतर एकदाच त्याला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करण्याची संधी दिली होती. “आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कठोर परिश्रमाने कमवावी लागते,” हीच शिकवण अक्षय त्याच्या मुलांना देत असतो. 
-    अक्षयची मुलगी नितारा अजूनही खूप लहान आहे. मात्र लहान वयातही निताराला सर्व प्रकारची पुस्तके वाचण्याची आवड आहे. 
-    ती रामायण, परीकथा अशी सर्व पुस्तक वाचते. कधीकधी अक्षयही आपल्या मुलीला नवीन कथा सांगत असतो. 
-    “माझी मुलं ही इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वाढली पाहिजेत,” अशी माझी इच्छा आहे, असे तो अनेकदा सांगतो. 
-    “मी माझ्या मुलीला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कधीकधी ती पायाच्या नखांना नेलपेंटही लावते. 
-    आयुष्यात मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमत त्यांना असावी, एवढीच माझी अपेक्षा आहे,” असे अक्षयने अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे. 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  