-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
मराठी ‘बिग बॉस’बद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे चित्र आहे.
-
या स्पर्धकांना दिले जाणारे वेगवेगळे टास्क आणि ते टास्क पूर्ण करताना त्यांची उडणारी तारांबळ, भांडणं यांमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
-
कुटुंबातील सर्वजण मिळून न चुकता हा कार्यक्रम पाहत असल्याचे घरोघरी पाहायला मिळते.
-
‘बिग बॉस’च्या घरामध्ये आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे.
-
आविष्कार दारव्हेकरची ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून एक्झिट झाली आणि घरामध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली.
-
नीथा शेट्टी-साळवीची घरात धमाकेदार एण्ट्री झाली.
-
नीथा उत्कृष्ट नृत्यांगना, अभिनेत्री व मॉडेल आहे.
-
नीथाने अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्येही काम केले.
-
‘फुगे’ या चित्रपटातून नीथाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
नीथा हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
नीथाने ‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
नीथा सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
इन्स्टाग्रामवर नीथाचे १ लाख ९६ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
नीथाच्या घरात येण्याने काय होणार, ती कोणत्या ग्रुपमध्ये जाणार, तिचा घरातला वावर कसा असेल, प्रेक्षकांची मनं ती जिंकू शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नीथा शेट्टी / इन्स्टाग्राम)

Tv Actress Son : मुंबईत टीव्ही अभिनेत्रीच्या १४ मुलाने आयुष्य संपवलं, ट्युशनला जायला सांगितल्याने इमारतीवरुन मारली उडी