-
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती पॉपस्टार निक जोनास हे कायमच चर्चेत असतात.
-
प्रियांकाने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिचे चाहते संभ्रमात पडलेत.
-
प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे अडनाव अचानक वगळले आहे.
-
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन जोनास हे नाव वगळले असून आता केवळ प्रियांका एवढंच नाव ठेवलं आहे.
-
प्रियांकाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्यात आणि तिच्या पतीदरम्यान म्हणजेच अभिनेता, गायक निक जोनासदरम्यानचे संबंध बिघडल्याच्या अफवा उठल्यात.
-
सोशल मीडियावर प्रियांका आणि निकमध्ये काहीसतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं असून प्रियांका वेगळं होण्याचा निर्णय तर घेत नाहीय ना?, प्रियांका आणि निकमध्ये काही वाद झालाय का? या दोघांमध्ये नक्की काही घडलंय का?, असे अनेक प्रश्न या दोघांचे चाहते विचारत आहे.
-
प्रियांका आणि निक जोनासचं २०१८ साली मोठ्या थाटामाटात राजस्थानमधील जोधपूर येथील शाही राजवाड्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न झालं होतं.
-
तेव्हापासून हे दोघे एकत्रच राहतात.
-
याच वर्षी प्रियांका आणि निकने त्यांच्या नवीन घरामध्ये दिवाळी साजरी केली.
-
प्रियांकाने अचानक जोनास हे अडनाव वगळण्यामागील कारणांबद्दल कोणताही खुलासा केलेला नसला तरी तिच्या आईने यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय.
-
मात्र प्रियांकाच्या आईने यासंदर्भात न्यूज १८ डॉट कॉमशी बोलताना भाष्य केलंय. मधू चोप्रा यांनी प्रियांका आणि निकच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा फेटाळून लावल्यात. “या चर्चा अर्थहीन आहेत, अफवा पसरवू नका,” असं मधून चोप्रा म्हणाल्यात.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा / इन्स्टाग्राम)

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE : “…तर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो”, राज्य सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर मनोज जरांगेंचा शब्द