-
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिचा पती पॉपस्टार निक जोनस यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
१ डिसेंबर २०१८ मध्ये या दोघांनी शाही विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधली.
-
जोधपूरमधल्या उमेद भवन या आलिशान पॅलेसमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला होता.
-
१ डिसेंबरला ख्रिश्चन तर २ डिसेंबरला पारंपरिक भारतीय पद्धतीनं हा स्वप्नवत सुंदर विवाहसोहळा संपन्न झाला होता.
-
प्रियांका आणि निकने नुकताच आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.
-
या सेलिब्रेशनचे काही फोटो प्रियांकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
लग्नाचा वाढदिवसानिमित्ताने प्रियांकाला चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
प्रियांका आणि निक या दोघांमध्ये १० वर्षांचं अंतर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियांका चोप्रा / इन्स्टाग्राम)

भारतातील IT क्षेत्र चिंतेत; अमेरिकेत आउटसोर्सिंगविरोधात विधेयक सादर, लाखो नोकऱ्या जाण्याची भीती