-
बॉलिवूड अभिनेता आर माधवन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
-
आता आर माधवन खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
त्याने एका मुलाखतीमध्ये पत्नी सरितासोबतचा किस्सा सांगितला आहे.
-
या मुलाखतीमध्ये त्याला बँडस्टँड आणि कार्टर रोडच्या काही आठवणी विचारल्या होत्या.
-
त्यावर आर माधवनने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
-
‘ज्यावेळी मी सरितासोबत फिरत होतो, तेव्हा माझ्याकडे एक जागा होती, जवळीक साधण्यासाठी. त्यामुळे हे दगड (समुद्रकिनारी असणारे) आमच्यासाठी बऱ्याच कहाण्या सांगणारे आहेत’, असे माधवन म्हणाला.
-
पुढे तो म्हणाला, ‘मुंबईतील इतर जोडप्यांप्रमाणेच आम्ही देखील डबलडेकर बसने तेथे जायचो, तेथील दगडांच्या मागे बसून रोमॅन्स करायचो, तेवढ्यात पोलीस येऊन घरी जा म्हणायचे. मला या ठिकाणच्या, पाणीपुरी, वडा पावच्या खरोखरच खूप गोड आठवणी आहेत.’
-
आर माधवनने रिलेशनशीपमध्ये असतानाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
-
मला असे वाटते की नात्यामधील मजामस्ती कधीही कमी व्हायला नको असे आर माधवन पुढे म्हणाला.
-
आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत असा खुलासा देखील त्याने केला आहे.
-
आर माधवन आणि सरिताने १९९९ साली लग्न केले.
-
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आर माधवन लग्न बंधनात अडकला होता.
-
त्यांना एक मुलगा आहे.

नितीन गडकरींनी सरन्यायाधीश गवईंना दिला ‘आदेश’, त्यांच्याकडून लगेच मान्यही….