-
इंडियन आयडॉल कार्यक्रमातील स्पर्धक हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. इंडियन आयडॉल १२ ची दुसरी विजेती आणि मराठमोळ्या सायली कांबळेचा नुकताच साखरपुडा पार पडला. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साखरपुड्याचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
-
सायलीने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा केला. या कार्यक्रमाचे अनेक फोटो धवलनेही शेअर केले आहेत. त्याला हटके कॅप्शनही दिले आहेत.
-
सायलीचा साखरपुडा थाटामाटात पार पडल्यानंतर नुकतंच तिच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यासोबत तिने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
-
‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, “आम्ही दोघं एकमेकांना गेल्या तीन वर्षांपासून ओळखतो. तो माझा एक चांगला मित्र होता. ज्याने मला काही महिन्यांपूर्वी लग्नासाठी प्रपोज केले आणि मी हो म्हणाली.”
-
“धवलने नेहमीच मला माझ्या कम्पर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा दिली आहे,” असेही तिने सांगितले.
-
यापुढे सायली म्हणाली, “मला आयुष्यात जे काही मिळाले त्यात मी समाधान मानणारी व्यक्ती आहे. मी फार मोठी स्वप्ने पाहत नाही. पण धवलनेच मला मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली.”
-
“आता मी माझ्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तेव्हाही त्याने मला मोठे विचार करण्याचा सल्ला दिला,” असेही तिने सांगितले
-
“त्याचे कुटुंब मला आणि माझ्या प्रोफेशनला खूप पाठिंबा देतात. मी स्वतःला भाग्यवान समजते की मी त्याच्या कुटुंबाचा एक भाग आहे,” असेही सायली म्हणाली.
-
यानंतर सायलीला लग्नाच्या तारखेबद्दल विचारले असता ती म्हणाली की, मे २०२२ पूर्वी आम्ही लग्न करणार नाही. कारण एका संगीत टूरसाठी मी परदेशात जाणार आहे.
दरम्यान सायलीने सप्टेंबर २०२१ दरम्यान इन्स्टाग्रामवर धवलसोबत फोटो शेअर केला होता. यावेळी तिने ‘चलो जी आज साफ-साफ कहती हूं, इतनी सी बात है, मुझे तुमसे प्यार है।’ असे कॅप्शन दिले होते.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा