-
प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२) रोजी निधन झालं आहे. (फोटो सौजन्य : बप्पी लहरी / इन्स्टाग्राम)
-
मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. (Photo : Express Archive)
-
बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. (Photo : Express Archive)
-
भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख करुन देणारा आणि त्याबद्दल प्रेम निर्माण करणारा संगीतकार आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय. (Photo : Express Archive)
-
बप्पीदा नावाने लोकप्रिय असणारे बप्पी लहरी हे त्यांच्या गाण्यांबरोबरच कपडे आणि सोन्याच्या दागिण्यांबद्दल असणाऱ्या आवडीसाठीही चर्चेत असायचे. (फोटो सौजन्य : बप्पी लहरी / इन्स्टाग्राम)
-
बप्पीदा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. (फोटो सौजन्य : बप्पी लहरी / इन्स्टाग्राम)
-
वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी बॉलिवूमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. (Photo : Express Archive)
-
१९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. (Photo : Express Archive)
-
मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. (Photo : Express Archive)
-
हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. (फोटो सौजन्य : बप्पी लहरी / इन्स्टाग्राम)
-
बप्पीदांनी ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’, ‘रंगबाज’ या चित्रपटांनाही संगीत दिलं. (Photo : Express Archive)
-
विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याचा दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. (फोटो सौजन्य : बप्पी लहरी / इन्स्टाग्राम)

सिद्धी योग आणि पुनर्वसू नक्षत्राच्या शुभ संयोगाने ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; तुमच्या राशीला कसा होणार लाभ? वाचा राशिभविष्य