-
प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कर्तृत्वाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करून दाखवलं आहे. यात कलाक्षेत्रातील अभिनेत्रीही मागे राहिलेल्या नाहीत. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण / फेसबुक)
-
बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन हा नेहमीच उत्सुकता आणि चर्चेचा विषय राहिलेला आहे. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर / फेसबुक)
-
परंतु बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना चित्रपटांसाठी अभिनेत्यांपेक्षाही जास्त मानधन मिळाले आहे. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / फेसबुक)
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारून तिच्या अभिनयाची जादू दाखवून दिली. (फोटो सौजन्य : आलिया भट / फेसबुक)
-
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील आलियाने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं. (फोटो सौजन्य : आलिया भट / फेसबुक)
-
आलियाची ‘राझी’ चित्रपटातील भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने आलियाच्या पतीची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
या भूमिकेसाठी आलियाने १० करोड रुपये इतके मानधन घेतले होते. तर विकी कौशलने तीन-चार करोड रुपये मानधन घेतले होते.(फोटो सौजन्य : आलिया भट / फेसबुक)
-
बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
‘कि अॅण्ड का’ या चित्रपटासाठी करीनाने अभिनेता अर्जुन कपूरपेक्षा जास्त मानधन घेतले होते. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनयासोबतच तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर / फेसबुक)
-
श्रद्धाने ‘स्त्री’ या चित्रपटासाठी अभिनेता राजकुमार रावपेक्षा जास्त मानधन घेतले होते. (फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर / फेसबुक)
-
अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.(फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण / फेसबुक)
-
दीपिकाने वेगवेगळ्या भूमिका साकारून अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण / फेसबुक)
-
एका चित्रपटासाठी दीपिका जवळपास २६ करोड रुपये इतके मानधन घेते. (फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण / फेसबुक)
-
‘पद्मावत’ या चित्रपटासाठी तिने १२ करोड रुपये मानधन घेतले होते. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेता रणवीर सिंगने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनापेक्षा ही रक्कम जास्त होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / फेसबुक)
-
माधुरी दीक्षितने ९०च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / फेसबुक)
-
‘हम आपके है कौन’ हा तिचा गाजलेला चित्रपट. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
-
या चित्रपटासाठी माधुरीने अभिनेता सलमान खानपेक्षा जास्त मानधन घेतले होते. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / फेसबुक)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल