-
काही आडनावे फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय आहेत, जसे की कपूर, खान किंवा बच्चन. परतु अनेक कलाकार त्यांचे आडनाव वापरत नाही. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींचाही समावेश आहे. रेखा, तब्बूशिवाय अनेक अभिनेत्री त्यांचं आडनाव लावत नाहीत. पाहुयात अशाच काही अभिनेत्री आणि त्यांची आडनावं…
-
एके काळच्या प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला यांचे पूर्ण नाव वैजयंती माला रमन आहे. परंतु त्या आडनाव लावत नाही. (फोटो: स्क्रीनग्रॅब)
-
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी रोजा देखील तिचे आडनाव वापरत नाही. सेल्वम असे त्यांचे आडनाव आहे. (फोटो: सोशल मीडिया)
-
अभिनेत्री ज्योतिकाचे पूर्ण नाव ज्योतिका सदना सर्वनन आहे. ज्योतिकाने कधीही चित्रपटसृष्टीत तिचं आडनाव वापरलं नाही. (फोटो: ज्योतिका ट्विटर)
-
अभिनेत्री रेखाचे आडनाव गणेशन आहे. रेखा तिचे आडनाव वापरत नाही. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अय्यपन होते. पण त्या श्रीदेवी नावाने ओळखल्या जायच्या. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
हेलननेही कधीच त्यांचे आडनाव वापरले नाही. त्यांचे पूर्ण नाव हेलन अॅन रिचर्डसन आहे. (फोटो: स्क्रीनग्रॅब)
-
तब्बूही तिचे आडनाव वापरत नाही. तब्बूचे पूर्ण नाव तबस्सुम हाश्मी आहे. (फोटो: फेसबुकवरून साभार)
-
काजोल तिचं आडनाव लावत नाही. तिचं आडनाव काजोल मुखर्जी आहे, तर लग्नानंतर तिचं आडनाव देवगण आहे. (फोटो इंडियन एक्सप्रेस)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन दावा, आता म्हणे “भारत-पाकिस्तान एकमेकांवर…”