-  
  अनिल कपूरचा ‘थार’ हा चित्रपट ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनिल कपूरसोबत त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरही दिसणार आहे. या चित्रपटापूर्वीही अनेकदा बॉलिवूडमधील पिता-पुत्रांची जोडी चित्रपटांमध्ये दिसलेली आहे.
 -  
  अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची जोडी ‘बंटी और बबली’, सरकार राज आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. दोघांच्या जोडीला पडद्यावर प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे.
 -  
  ‘कोई मिल गया’ या चित्रपटात राकेश रोशन हृतिक रोशनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
 -  
  याचबरोबर संजय दत्त देखील सुनील दत्त यांच्यासोबत मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सुनील दत्त यांनी संजयच्या वडिलांचीच भूमिका केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
 -  
  ‘जानशीन’ या चित्रपटात फरदीन खानने त्याचे वडील फिरोज खान यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: फिरोज खान यांनी केले होते.
 -  
  शाहिद कपूर ‘शानदार’ या चित्रपटात वडील पंकज कपूर यांच्यासोबत दिसला होता. याशिवाय ही पिता-पुत्र जोडी जर्सी या चित्रपटातही दिसणार आहे.
 
-  
  तर, ‘बेशरम’ या चित्रपटात रणबीर कपूरने वडील ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली.