-
बॉलीवूड सेलिब्रिटींची लाइफस्टाइल, फॅशन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. (फोटो : मिलिंद सोमण/ इन्स्टाग्राम)
-
चाहत्यांना नेहमीच आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला आवडते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
लक्झरियस आयुष्य जगण्यासोबतच कलाकार त्यांच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसतात. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
कलाकरांचं फिटनेस, सिक्स अॅब्स पाहून कधी कधी चाहते देखील अवाक होतात.(फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
वयाच्या चाळीशीतही फिट असणाऱ्या कलाकारांचे फिटनेस सिक्रेट आज आपण जाणून घेणार आहोत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
सलमान खान : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या फिटनेसवर चाहते फिदा आहेत. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
सलमान खान रोज न चुकता दोन-तीन तास व्यायाम करतो. एवढंच नाही तर फिट राहण्यासाठी तो रोज सायकल देखील चालवतो. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अक्षय कुमार : बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमारकडे तायक्वांदो या खेळप्रकारातील ब्लॅक बेल्ट आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अक्षय एक मार्शिअल आर्टिस्ट आहे. फिटनेससाठी व्यायामासोबतच तो मार्शिअल आर्ट देखील करतो. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
दीपिका पदुकोण : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण फिट राहण्यासाठी दररोज व्यायाम करते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
पण व्यायामासोबतच दीपिका स्ट्रेचिंग आणि किक बॉक्सिंगचं वर्कआऊट देखील करते. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
रणवीर सिंग : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या फिटनेसबद्दल काही वेगळं सांगायला नको. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
त्याच्या सिक्स अॅब्सवर चाहते फिदा आहेत. (फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
फिटनेस ठेवण्यासाठी रणवीर रोज जीममध्ये जाऊन वर्कआऊट तर करतोच पण याशिवाय पोहणे, सायकल चालवणे, पळणे हे व्यायामप्रकार सुद्धा करतो. (फोटो : रणवीर सिंग/ इन्स्टाग्राम)
-
मलायका अरोरा : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
मलायका वर्कआऊटचे अनेक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
फिटनेससाठी मलायका रोज व्यायाम तर करतेच पण यासोबतच ती योगा देखील करते. (फोटो : मलायका अरोरा/ इन्स्टाग्राम)
-
मिलिंद सोमण : बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमन यांच्या फिटनेसचे चाहते दिवाने आहेत. (फोटो : मिलिंद सोमण/ इन्स्टाग्राम)
-
मिलिंद सोमण फिटनेस फ्रिक आहेत. व्यायामाचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात . (फोटो : मिलिंद सोमण/ इन्स्टाग्राम)
-
वयाच्या पन्नाशीतही कायम ठेवलेल्या फिटनेसने ते सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतात. (फोटो : मिलिंद सोमण/ इन्स्टाग्राम)
-
त्यांच्या फिटनेस रहस्य म्हणजे व्यायाम आणि केवळ व्यायाम. (फोटो : मिलिंद सोमण/ इन्स्टाग्राम)

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”