-
अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही मराठी मालिकांमुळे घराघरांत पोहचली. स्नेहलताचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने साकारलेली ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका तर प्रचंड गाजली.
-
आजही तिला याच भूमिकेमुळे प्रेक्षक ओळखतात.
-
ऐतिहासिक भूमिका साकारत असताना तिला पारंपरिक लूकमध्ये पाहणं प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. पण आता ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
-
तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले.
-
पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये स्नेहलताने हे खास फोटोशूट केलं होतं.
-
मात्र ट्रोलर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. आता तिने एक खास पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
-
“तुमच्यावरील संस्कार तुमच्या कपड्यांवरून नाही तर तुमच्या विचारांमधून कळतात.” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
कौतुकास्पद गोष्ट म्हणजे स्नेहलताने ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत आपल्या नव्या लूकमधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या