-
फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक असलेली अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.
-
मलायका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.
-
मलायका नेहमीच इन्स्टाग्रामवर स्वतःचे हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते जे अनेकदा व्हायरल होतात.
-
आताही मलायकाची इन्स्टाग्राम पोस्ट आणि काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर गोल्डन कलरच्या बॅकलेस गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची सध्या इंटरनेटवर बरीच चर्चा आहे.
-
या फोटोंमध्ये गोल्डन- बॅकलेस ड्रेसचा लुक मलायकानं नेकलेस, ब्रेसलेट आणि हेवी रिंगसह पूर्ण केला आहे. तसेच तिने केस मोकळे सोडले आहेत.
-
या ड्रेसमध्ये मलायकाने दिलेल्या पोजवर चाहते घायाळ झाले आहेत. ४९ वर्षीय मलायकाचा फिटनेस कमालीचा असल्याच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
मलायकाच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत.
-
एवढंच नाही तर अभिनेत्री करीना कपूर खाननं देखील तिच्या फोटोवर, ‘तू कोणाला पाहत आहेस?’ अशी कमेंट केली आहे. (फोटो साभार- मलायका अरोरा इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल