-
दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ शोचं (Koffee with Karan 7) सातवं पर्व सुरु झालं आहे.
-
आता या पर्वाच्या नव्या भागामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हजेरी लावली.
-
या भागामाध्ये करणने आमिर-करीनाला खासगी आयुष्याबाबत तसेच चित्रपटसृष्टीबाबत अनेक प्रश्न विचारले.
-
बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर देखील करणने आमिरला प्रश्न विचारला.
-
‘पुष्पा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ’, ‘बाहुबली’सारखे चित्रपट सध्या पाहिले जातात. हिंदीमध्येही असे प्रयोग झाले पाहिजे का? एखादी कोणती अशी गोष्ट आहे की जी हिंदी चित्रपटांमध्ये असली पाहिजे? असा प्रश्न करणने आमिरला विचारला.
-
यावेळी आमिर म्हणाला, “अॅक्शनपट चित्रपट बनवू नका असं मी म्हणत नाही. जे विषय प्रेक्षकांना आपलंस करतील त्याच कथेवर आधारित चित्रपट बनवा.”
-
“हिंदी चित्रपटांमध्ये आपण काही चुकीचं करत आहोत असं माझं मत नाही. कारण प्रत्येक चित्रपट बनवणारा व्यक्ती विचारपूर्वक चित्रपट बनवतो.”
-
“पण प्रेक्षकांना आवडतील अशाच कथांची आपण निवड केली पाहिजे. आपल्यामधील अधिकाधिक लोकांनी हिच गोष्ट अजूनही समजत नाही.”

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”