-
अभिनेत्री काजोल बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.
-
एवढंच नाहीतर काजोल आणि तिचा पती अजय देवगण यांनी बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
दोघंही एक आदर्श जोडी म्हणून अनेकांची प्रेरणा आहेत.
-
पण एक वेळ अशीही आली होती जेव्हा बॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडीमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे वाद निर्माण झाले होते.
-
पतीच्या अफेअरच्या चर्चा ऐकल्यानंतर काजोलने अजय देवगणला अक्षरशः धमकी देखील दिली होती.
-
अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊयात या दोघांमध्ये नेमकं काय घडलं…
-
अजय देवगण आणि काजोल बॉलिवूडच्या आदर्श आणि लोकप्रिय जोड्यांपैकी एक असले तरी कधी या दोघांच्या संसारातही वादळ आलं होतं.
-
एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे काजोल आणि अजय यांच्यात वाद सुरू झाले होते मात्र काजोलनं वेळीच सर्व गोष्ट व्यवस्थित सांभाळत आपला संसार सावरला होता.
-
एवढंच नाही तर तिने यासाठी अजय देवगणला घर सोडून जाण्याची धमकी देखील दिली होती.
-
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्यंतरीच्या काळात अजय देवगण अभिनेत्री कंगना रणौतशी जवळीक वाढल्याने चर्चेत आला होता.
-
अजय कंगनासोबत ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’चे शूटिंग करत असताना त्यांच्यात जवळीक वाढली असं बोललं जातं.
-
यामुळे काजोलच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांच्यात वाद झाल्याच्याही चर्चा होत्या.
-
जेव्हा काजोलला याबद्दल समजलं तेव्हा तिने अजयला त्यावरून बरंच सुनावलं होतं आणि घर सोडून जाण्याची धमकी दिली होती असं म्हटले जाते.
-
त्यानंतर एका मुलाखतीमध्ये अजयने विवाहबाह्य संबंधांबद्दल वक्तव्य केलं होतं.
-
अजय म्हणाला होता, “मी असे म्हणत नाही की विवाहबाह्य संबंध होत नाहीत. परंतु, कधीकधी प्रसार माध्यमं दोन लोकांना एकत्र पाहिल्यानंतर चुकीचा अर्थ लावतात.”
-
“मी माझे नाव कोणाशीही जोडू देत नाही. मला माझे काम आवडते आणि ते झाल्यावर मी सरळ घरी येतो.” असंही तो म्हणाला होता.
-
दरम्यान १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती.
-
अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता.
-
मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते.
-
काही दिवसांनी काजोलचे कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. या दोघांनी १९९९मध्ये लग्न केलं. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…