-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दरवर्षी आपल्या घरच्या बाप्पाचं थाटामाटात स्वागत करते.
-
मात्र यंदा सोनालीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं नसल्याचं तिने सांगितलं आहे.
-
सोनालीने आपल्या घरच्या बाप्पाचे जुने फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीच्या कुटुंबामधील मंडळी देखील दिसत आहेत.
-
तसेच काही फोटोंमध्ये सोनाली स्वतः गणरायाची मुर्ती तयार करताना दिसत आहे.
-
तिने चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत भावूक पोस्ट शेअर केली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच सोनालीच्या आजीचं निधन झालं. यासंदर्भातच तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
-
ती म्हणाली, “इतक्या वर्षांत आम्ही यंदा पहिल्यादांच गणपती बसवला नाही. आजी म्हणाली होती, मी गणपती येईपर्यंत थांबते पण… निदान त्या शारीरिक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल असं वाटतं.”
-
“माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पाकडेच गेली आहे. प्रिय आजी (आई), पुढच्या वर्षी, तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू.”
-
आजीचं निधन झाल्यामुळे कुलकर्णी कुटुंबीयांनी यावर्षी गणपतीच्या मुर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल