-    छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. 
-    ‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. 
-    बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
-    येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. नुकतंच एका नव्या टीझरद्वारे याबाबतची माहिती समोर आली आहे. 
-    त्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे. 
-    गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील विविध स्पर्धकांची संभाव्य यादी समोर आली होती. 
-    बिग बॉसच्या या पर्वात प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच हार्दिक जोशी सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. 
-    त्यानंतर अभिनेते किरण माने यांचे नावही बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये घेतलं जात आहे. 
-    यापाठोपाठ आता आणखी एका मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रीचे नाव बिग बॉस स्पर्धकांच्या यादीत घेतलं जात आहे. 
-    लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव ही बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. 
-    तिच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे या चर्चांना उधाण आले आहे. 
-    अभिनेत्री सायली संजीव हिने नुकतीच एक इन्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. 
-    या स्टोरीमुळे ती बिग बॉस मराठी मध्ये सामील होणार हा असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 
-    यात तिने तिचा एक फोटो शेअर केला होता. 
-    त्याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “येत्या १ ऑक्टोबरपर्यंत नेटवर्क नसलेल्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. तेव्हा लवकरच भेटू.” 
-    तिच्या हा फोटो आणि कॅप्शन सध्या व्हायरल होत आहे. 
-    येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठी सुरु होत आहे. 
-    त्यामुळे सायली बिग बॉसच्या घरात दिसणार असा अंदाज अनेकांनी बांधला जात आहे. 
-    काही दिवसांपूर्वीच यंदा बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. 
-    महेश मांजरेकर हेच बिग बॉसचे चौथे पर्वही होस्ट करणार आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 
-    फोटो – सायली संजीव/ इन्स्टाग्राम 
 
  Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  