-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायम चर्चेत असतो. मग तो त्याचा येणारा चित्रपट असो किंवा त्याच्यावर चालवलेला खटला असो, कधी चांगल्या तर कधी चुकीच्या गोष्टींमुळे सलमान चर्चेत असतो.
-
मध्यंतरी लॉरेन्स बिश्नोई नावाच्या गॅंगस्टरमुळे सलमान चर्चेत आला होता.
-
सलमानला जीवेमारण्याची धमकी दिल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचा दूसरा प्लॅनदेखील तयार होता ही बातमी नुकतीच न्यूज १८ इंडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे.
-
सिद्धू मुसेवालाचा खून करण्याआधीच लॉरेन्सने सलमानला जीवेमारण्याची योजना आखली होती.
-
हा सापळा रचण्यात गोल्डी बराड आणि लॉरेन्सच्या गॅंगचा एक शूटर कपिल पंडित हे दोघे सामील होते. ते पनवेलमध्ये भाड्याच्या घरात राहू लागले. पनवेल जवळच सलमानचं फार्म हाऊस आहे. त्याच फार्महाऊसवर सलमानला मारण्याचा प्लॅन त्यांनी आखला होता.
-
हीट अँड रन केसनंतर सलमानच्या गाडीचा वेग तसा बराच कमी असतो आणि फार्म हाऊसवर जाताना सलमानबरोबरच शेरा हाच त्याचा एकमेव बॉडीगार्ड असतो. ही माहितीदेखील या गॅंगने मिळवली होती.
-
एवढंच नाही तर सलमानच्या फार्म हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याचीसुद्धा या लोकांनी पाहणी केली होती. रस्त्यावर खड्डे बरेच असल्याने गाडीचा वेग आणखीन मंदावेल आणि आपला प्लॅन सफल होईल असं त्यांच्या मनात होतं.
-
असं म्हंटलं जातं की यादरम्यान सलमान २ वेळा त्याच्या या फार्महाऊसवर आला पण या दोन्हीवेळा लॉरेन्सचे शूटर्स अयशस्वी ठरले.
-
सलमानच्या जीवाला अजूनही धोका आहे असं म्हंटलं जातं. या सगळ्या प्रकारानंतर सलमानची सुरक्षा आणखीन वाढवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

पावसाळ्यात घरात बाथरुममधून गोम, गांडूळ येतात? मग फॉलो करा फक्त ‘या’ 3 ट्रिक्स, पुन्हा दिसणार नाही