-
झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
फक्त सिनेसृष्टीत नव्हे तर राजकीय पातळीवरही हा कार्यक्रम चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हजेरी लावली.
-
यावेळी त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील काळाबद्दल विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
-
उषा नाडकर्णी या अभिनेत्री होण्याआधी बँकेत नोकरी करायच्या.
-
अभिनय, नोकरी, घर, नाटक अशी सगळी तारेवरची कसरत करत करत त्या इथवर पोहाचल्या. या प्रवासात त्यांना अनेक मदतीचे हात मिळाले.
-
त्याउलट अनेक वाईट माणसंही भेटलीत. असाच एक वाईट अनुभव त्यांनी ‘बस बाई बस’च्या सेटवर शेअर केला.
-
‘ताई तुम्ही अनेक वर्ष बँकेत नोकरी केली. एखाद्या निर्मात्याने तुमचे पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्याच्याकडून ते चांगलेच वसूल केले असतील?’ असा प्रश्न त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला होता.
-
त्यावर त्या म्हणाल्या, “या जगात जितकी चांगली माणसं आहेत, तितकीच लबाड माणसंही आहेत.”
-
“मी एक मालिका करत होते. त्याचे १० एपिसोड करून मी सोडली. पण त्याचा एक पैसाही मला दिला गेला नाही.”
-
“मी कित्येक वेळा मॅनेजरला फोन केला. पण फोन केला की वेगळीच माणसं फोन उचलून मॅनेजर नाही, असे सांगायचे.”
-
“हा रोज कसा नसतो, असा प्रश्न मला पडायचा. पण एक दिवस गंमत झाली, त्या मॅनेजरनेच नेमका माझा फोन उचलला.”
-
“त्यावेळी मी त्याला एकच वाक्य बोलले. माझे पैसे देणार आहेस की नाही?”
-
“नाहीतर मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन तुझी चड्डी खोलेन आणि पैसे घेऊन जाईन.”
-
“त्यानंतर तिसऱ्याच दिवशी माझ्या घरी माझा चेक आला.” असे उषा नाडकर्णींनी म्हटले.

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार