-
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. आपल्या अभिनयाने आणि हटके लुक्समुळे त्या प्रेक्षकांचं मन जिंकतात’
-
नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या साडीतले फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
स्पृहा पारंपरिक अशा साडीत खूपच सुंदर दिसते. तिच्या सौंदर्यांत आणखीनच भर पडते.
-
स्पृहाने एकांकिका, नाटक, मालिका, चित्रपट अशा माध्यमांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे.
-
‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
-
‘सूर नवा ध्यास नवा’ ‘ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी करत आहे.
-
कवयित्री, लेखिका, अभिनेत्री अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.
-
या कार्यक्रमात गाण्यांची मैफल तर रंगतेच मात्र स्पृहाच्या निवेदनाने कार्यक्रमाला रंगत येते.
-
स्पृहाला लेखन, अभिनयासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
-
अभिनय आणि निरागस चेहरा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
-
‘पुनश्च हरी ओम’ या चित्रपटात ती आपल्यासमोर एका वेगळ्या भूमिकेतून दिसली होती.
-
स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक