-
छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते.
-
ऋताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे.‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे ती अजूनही प्रसिद्धीझोतात आहे.
-
नुकतंच ऋता दुर्गुळने तिच्या थायलंड वारीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
ऋता ही तिच्या वाढदिवसानिमित्त परदेशात फिरायला गेली होती.
-
यातील एका फोटोत ती छान बीचजवळ बसून एन्जॉय करताना दिसत आहे.
-
तर एकात तिने पोलका डॉट स्कर्ट टॉप परिधान करत समुद्रकिनाऱ्यालगतचे फोटो शेअर केले आहेत.
-
त्यासोबत ऋताने एक व्हिडीओ शेअर करत तिच्या या मनमोहक सफरीची झलक दाखवली आहे.
-
तर एका फोटोत तिने विविध रंगीबेरंगी ड्रेस परिधान केला आहे.
-
यावेळी तिने थायलँडमधील फि-फि आयलँडवर खास फोटोशूट केलं आहे.
-
तसेच ती फुकेट आणि थायलँडमधील निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेल्याचेही पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान लवकरच ती कन्नी नावाच्या एका चित्रपटात झळकणार आहे. त्यासोबतच महेश मांजरेकरांच्या ‘एका काळेचे मणी’ या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?