-
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट ठरला असून चित्रपटाने जगभरात तब्बल ३०० कोटीहून अधिक कमाई केली आहे.
-
चित्रपट बऱ्याच कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. रणबीर, आलिया तसेच दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या काही आधीच्या वादग्रस्त विधानांचा आधार घेऊन चित्रपट हाणून पाडायचा चांगलाच प्रयत्न झाला.
-
आज आपण रणबीरने केलेल्या अशाच काही वादग्रस्त विधानांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
२०१८ मध्ये रणबीरने एका मॅगझीनला मुलाखत देताना त्याच्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल कबूल केलं होतं.
-
वयाच्या १५ व्या वर्षापासूनच रणबीरला धूम्रपानाची सवय लागली होती हे त्याने सांगितलं होतं. इतकंच नाही तर सिगारेट, दारू आणि गांजा या तिनही गोष्टींची सवय असल्याचं रणबीरने सांगितलं होतं. रणबीरच्या या वक्तव्यावरुन त्याची खूप आलोचना झाली होती.
-
२०११ मध्ये ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपले आई वडील ऋषी कपूर आणि नितू कपूर यांच्या नात्याविषयी खुलासा केला होता.
-
यामध्ये रणबीरने त्यांच्या आई वडिलांमध्ये सतत खटके उडत असल्याचं स्पष्ट केलं होतं शिवाय याचा परिणाम त्याच्या मनावर झाला हेदेखील रणबीरने यामध्ये कबूल केलं होतं.
-
मध्यंतरी रणबीरने त्याच्या प्रेमप्रकरणाबद्दलही खुलासा केला होता.
-
रणबीर जेव्हा दीपिका पदूकोणबरोबर रिलेशनशिपमध्ये होता तेव्हा त्याने कोणालातरी चीट केल्याचंही कबूल केलं होता. यादरम्यान त्याचं दीपिका आणि कतरिना अशा दोन अभिनेत्रींबरोबर नाव जोडलं गेलं होतं. रणबीरच्या या वक्तव्यामुळे त्याची प्रतिमा खराब झाली होती. अखेर त्याने यावर्षी आलिया भट्टबरोबर संसार थाटला.
-
इतकंच नाही तर एका मुलाखतीमध्ये रणबीरने १५ व्या वर्षीच त्याची वर्जिनिटी घालवल्याचं कबूल केलं होतं ज्यामुळे त्याच्यावर बरीच टीकादेखील झाली.
-
नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनदरम्यान रणबीरचा गोमांस खातानाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला. त्यावरूनही लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं.
-
रणबीरने मध्यंतरी आपल्या काकांना रणधीर कपूर यांना डिमेंशिया (विसरण्याचा आजार) असल्याचंही वक्तव्यं केलं होतं, पण नंतर खुद्द रणधीर कपूर यांनी त्याचं हे म्हणणं खोडून काढलं होतं. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार