-    दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरही आई – वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन चित्रपटसृष्टीत आली. 
-    ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. 
-    त्यानंतरही तिने ‘गुंजन सॅक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’ अशा विविध चित्रपटातून कामं केली. 
-    मात्र तिच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तिची तुलना तिच्या आईशी, म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी केली गेली. 
-    श्रीदेवी यांच्या मानाने जान्हवीला चांगला अभिनय करता येत नाही असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टिका केली होती. 
-    आता यावर बोनी कपूर यांनी त्यांचे मत मांडत जान्हवीची बाजू घेतली आहे. 
-    एखाद्या भूमिकेत शिरून ती उत्तमप्रकारे साकारणे ही श्रीदेवीची खासियत होती. जान्हवीनेही ते आत्मसात केलं आहे. 
-    श्रीदेवीने लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. 
-    १५० ते २०० दक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर उत्तर भारतातील लोकांनी श्रीदेवीचे काम पाहिले. 
-    जान्हवीने तर आत्ताच तिचे करिअर सुरु केले आहे. 
-    जान्हवीसाठी वेगळा प्रवास आहे आणि तो छान असणार याची मला खात्री आहे. 
-    त्यामुळे श्रीदेवीच्या कोणत्याही कामाशी जान्हवीची तुलना करू नका. 
 
  तरुणांमध्ये ‘या’ ३ कारणांमुळे झपाट्याने वाढतोय कॅन्सरचा धोका; जीवघेण्या सवयी आताच सोडा, नाही तर मोजावी लागेल मोठी किंमत 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  