-
कमी बजेटमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालत आहे.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५१ दिवसांचा टप्पा कधीच पूर्ण केला आहे.
-
जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींची विश्वविक्रमी कमाई केली आहे.
-
या चित्रपटाने अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी हा चांगलाच चर्चेत आला आहे. रातोरात रिषभ स्टार झाला आहे.
-
या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका निभावली असून याचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे.
-
प्रेक्षकांनी त्याची भूमिका चांगलीच डोक्यावर घेतली आहे.
-
रिषभच्या पत्नीचाही या चित्रपटात खारीचा वाटा आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषेवर रिषभच्या पत्नीने मेहनत घेतली आहे.
-
याबरोबरच चित्रपटातील प्रेम कहाणीसुद्धा लोकांना प्रचंड आवडली आहे.
-
या चित्रपटाला मिळणाऱ्या घवघवीत यशानंतर मध्यंतरी रिषभने मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात येऊन बाप्पाचे आशीर्वादही घेतले.
-
नुकतंच एका मुलाखतीमध्ये रिषभने या चित्रपटाच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे.
-
या चित्रपटात रिषभने साकारलेलं ‘शिवा’ हे पात्र अमिताभ बच्चन यांच्यापासून प्रेरित असल्याचं रिषभने स्पष्ट केलं आहे.
-
रिषभ स्वतः बच्चन यांच्या चित्रपटांचा चाहता असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
-
या भूमिकेत रिषभला बच्चन यांनी साकारलेल्या ‘एंग्री यंग मॅन’मधील काही गुण दिसले त्यामुळे ही भूमिका बच्चन यांच्या एंग्री यंग मॅनपासून प्रेरित असल्याचं रिषभने स्पष्ट केलं आहे.
-
प्रथम कन्नडमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नंतर हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषेत डब करून प्रदर्शित करण्यात आलं.
-
मनोरंजन चित्रपटसृष्टीतील कित्येक दिग्गजांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनीदेखील रिषभची भेट घेऊन त्याचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया