-
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.
-
आता कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याचं समोर आलं होतं. आता त्यांना ते ठिकाण मिळालं आहे.
-
याआधी हे दोघे दिल्लीत लग्न करणार होते, मात्र आता ते त्यांनी त्यांच्या लग्नस्थळ बदललं आहे.
-
त्यांना त्यांचा लग्नसोहळा अत्यंत खासगीत संपन्न करायचा आहे. त्यांचे नातेवाईक आणि जवळची मित्रमंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
-
कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा चंदीगड येथे पार पडणार असल्याचं ‘फिल्मफेअर’ने त्यांच्या एका वृत्तात सांगितलं.
-
चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हे शाही लग्न संपन्न होणार असल्याचं बोललं जात आहे.
-
त्याचबरोबर लग्नानंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही होणार आहे. परंतु सिद्धार्थ किंवा कियाराने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
-
या विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधीलही लोकप्रिय स्टार्स हजेरी लावणार असल्याचं बोललं जात आहे. कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या काही जवळच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना निमंत्रित करू शकतात.

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम