-
आमिर खानच्या ‘देहल्ली बेहल्ली’ चित्रपटाने पूर्ण चित्रपटसृष्टी खळबळ उडाली होती.
-
या चित्रपटातील’ भाग डी के बोस’ हे गाणं वादग्रस्त ठरलं होत. या गाण्याने कॉपीराइट कायदाच भंग केला असा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला होता.
-
यशराज निर्मिती संस्थेचा आणि माधुरी दीक्षितने अभिनय केलेला ‘आजा नचले’ हा चित्रपट नृत्यावर आधारित होता. या चित्रपटातील ‘आजा नचले’ या गाण्यातील काही शब्दांवर उत्तर प्रदेशातील एका जमातीने आक्षेप घेतला होता.
-
त्यांच्या मते या गाण्यात त्या जातीचा अपमान केला आहे. मात्र यशराजने वर माफीदेखील मागितली होती.
-
बोल्ड अभिनेत्री सनी लियोनची अनेक गाणी चर्चेत असतात. त्यातील ‘पनघट’ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल बंदी घालण्याची मागणी केली अनेक साधू संतांनी केली होती.
-
करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटावर मोठ्यानं प्रमाणा टीका झाली होती. यातील ‘राधा’ गाण्यात ‘राधा सेक्सी ‘असा उल्लेख असल्याने धार्मिक भावना दुखावल्याबद्दल करण जोहरवर गुन्हा दाखल झाला होता.
-
‘दम मारो दम ‘चित्रपटातील दीपिकावर चित्रित झालेले गाणे मूळ गाण्याचे रिमिक्स होते. या गाण्याचे मूळ हक्क घेण्यात आले होते मात्र तरीही देव आनंद आणि झीनत अमान यांना हे नवीन गाणे आवडले नव्हते.
-
सलमानच्या ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम’ हुयी हे गाणे चांगलेच गाजले मात्र या गाण्यावर इमामी कंपनीने केस केली होती. कारण या गाण्यात त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे प्रॉडक्ट झंडू बामचा उल्लेख केला होता.
-
शाहिद कपूरच्या ‘कमीने’ चित्रपटात एका गाण्यावरून वाद निर्माण झाला होता.’ धन ते नान’ या गाण्यात तेली शब्द होता ते काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय तेली राठौर चेतना महासंघ आणि सपाचे राज्यसभा सदस्य राम नारायण साहू यांनी सेन्सॉर बोर्डाकडे केली होती. फोटो सौजन्य : यूट्यूब

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”