-
अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘वेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून बऱ्याच काळानंतर रितेश आणि जेनेलिया ही जोडी आपल्याला पडद्यावर दिसणार आहे.
-
३० डिसेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यामध्ये सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आहे. याआधी ‘लय भारी’ या चित्रपटातही तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.
-
दरम्यान हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘माजिली’ या चित्रपटाच्या कथेवर आधारित आहे. मात्र रितेशने सांगितले की या चित्रपटात प्रेक्षकांना आणखी काही नव्या गोष्टीही पाहायला मिळणार आहेत.
-
वेड चित्रपटात मीरा ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध बालकलाकार खुशी हजारे हिने साकारली आहे.
-
खुशीने आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपट तसेच अनेक जाहिरातींमध्ये काम केलेले आहे.
-
२०२० सालच्या ‘प्रवास’ या चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.
-
नुकतीच तिने ‘आपडी थापडी’ या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि मुक्त बर्वे यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे.
-
२०१६ साली खुशीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘सरबजीत’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली.
-
तर नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित ‘मंटो’ चित्रपटातही तिने अभिनय केला आहे.
-
यानंतर ती अभिनेता विकी कौशलसह ‘भूत’ या भयपटातही दिसली होती.
-
जान्हवी कपूरच्या ‘मिली’ या चित्रपटात तिने एक छोटी भूमिका साकारली आहे.
-
‘वेड’ हा खुशीने अभिनित केलेला तिसरा मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून तिच्या येण्यामुळे कथानकात ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. (Photos: Instagram)

न्या.गवईंनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलले मोठे पाऊल….