-  
  मुंबईची रॅपर सृष्टी तावडे ‘हसल’ या शोमुळे चांगलीच लोकप्रिय झाली होती.
 -  
  तिचं ‘मै नही तो कौन बे’ हे रॅप साँग इतकं व्हायरल झालं की तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली होती.
 -  
  नुकताच सृष्टीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
 -  
  सृष्टी तावडे नुकतीच ‘इंडिया टुडे एन्क्लेव्ह’मध्ये पोहोचली होती, तिथे तिने तिच्या बालपणीची वेदनादायक कहाणी सांगितली.
 -  
  वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिच्यावर अत्याचार झाले आणि ते ३ वर्षे सुरू होते, तिची मोलकरीण तिला खूप मारायची, असा खुलासा तिने केला.
 -  
  कुटुंबात सृष्टीशिवाय आई, वडील, भाऊ आणि मोलकरीण असे चार जण होते.
 -  
  सृष्टीने सांगितले की, तिचे आई-बाबा जेव्हा ऑफिसला जायचे तेव्हा घरात गुपचूप एक माणूस यायचा.
 -  
  मोलकरीण आणि तो माणूस यांच्यासाठी सृष्टी अडचण ठरायची.
 -  
  त्यामुळे तिला गप्प करण्यासाठी मोलकरीण खूप मारत असे. तसेच हे सर्व आईला सांगू नकोस, अशी धमकीही ती द्यायची.
 -  
  त्यामुळे बालपण मोलकरणीच्या मारहाणीच्या आघातात गेलं, असं सृष्टीने सांगितलं.
 -  
  मी माझ्या पालकांना त्यांच्याबद्दल सांगितलं नव्हतं, तरीही मी सांगेन या भीतीने त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली, असं सृष्टी म्हणाली.
 -  
  “वेगवेगळ्या पद्धती वापरून त्यांनी तीन वर्षे मला त्रास दिला. घरातील मिळेल त्या सामानाने मला मारलं, कालांतराने मी त्यातून बाहेर पडले पण त्याचा माझ्या आयुष्यावर खूप परिणाम झाला,” असं सृष्टी म्हणाली. (फोटो- सृष्टी तावडे इन्स्टाग्राम)
 
  डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार नाकारल्याने व्हाईट हाऊसचा संताप; म्हणाले, “त्यांनी राजकारणाला…”