-
नेपोटीजमचा आरोप हा बऱ्याचदा बॉलिवूडवर लागताना आपण पाहिला असेल. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडच्या नेपोटीजमवर बरंच बोललं आणि लिहिलं गेलं आहे.
-
पण केवळ बॉलिवूडमध्येच नेपोटीजम आहे अशातला भाग नाही, तर आज ज्या दाक्षिणात्य चित्रपटांना आपण डोक्यावर घेऊन नाचत आहोत तिथेही नेपोटीजम मोठ्या प्रमाणात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये ही काही महत्त्वाची कुटुंबं आहेत ज्यांचा बराच बोलबाला आहे.
-
अल्लू अर्जुन कुटुंब : तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन हा त्यांच्या घराण्यातील तिसरी पिढी आहे जी या क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचे आजोबा अल्लू रामलिंगैया हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठं प्रस्थ होतं. १९९० मध्ये त्यांना पद्मश्रीदेखील देण्यात आली होती. शिवाय अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद हेदेखील एक प्रसिद्ध निर्माते आहेत. याबरोबरच अल्लूचा भाऊदेखील एक चांगला अभिनेता आहे.
-
चिरंजीवी कुटुंब : हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठं कुटुंब आहे. चिरंजीवी यांच्या लोकप्रियतेबद्दल आपल्याला ठाऊक आहेच. चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण हा एक सुपरस्टार आहे तर राम चरणची आई म्हणजेच चिरंजीवी यांची पत्नी ही अल्लू रामलिंगैया यांची बहीण आहे. याबरोबरच चिरंजीवी यांचे दोन्ही भाऊ पवन कल्याण आणि नागेंद्र बाबू हे दोघेही या क्षेत्रात कार्यरत आहे.
-
रजनीकांत कुटुंब : रजनीकांत यांचंदेखील कुटुंब याच क्षेत्रात आहे. त्यांची मुलगी ऐश्वर्या ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर दुसरी मुलगी सौंदर्या ही उत्तम दिग्दर्शिका आहे. याबरोबरच त्यांचा जावई धनुष हादेखील लोकप्रिय अभिनेता आहे. ऐश्वर्या आणि धनुष हे आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.
-
दग्गुबती कुटुंब : १९६४ मध्ये सुरेश प्रोडक्शनमधून दग्गुबती रामानायडू यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांची तीनही मुलं याच क्षेत्रात काम करतात त्यापैकी वेंकटेश हे एक प्रचंड लोकप्रिय अभिनेते आहेत तर राणा दग्गुबती हा दाक्षिणात्य अभिनेता याच कुटुंबाचा भाग आहे.
-
अक्किनेनी कुटुंब : अक्किनेनी नागेश्वर राव हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील खूप मोठे निर्माते होते. त्यांचा मुलगा अक्किनेनी नागार्जुन यांनीदेखील या क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा नागा चैतन्य यानेसुद्धा अभिनय क्षेत्रात स्वतःचं नाव कामावलं.
-
एनटीआर कुटुंब : ज्युनिअर एनटीआरही एका मोठ्या फिल्मी परिवारामधूनच पुढे आलेला आहे. त्याचे आजोबा रामा राव हे एक उत्कृष्ट अभिनेते आणि निर्माते होते. १९६८ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानितही केलं होतं. याबरोबरच ज्युनिअर एनटीआरचे वडील नंदमुरी हरिकृष्णा हेदेखील उत्तम अभिनेते आणि निर्माते आहेत.
-
हासन कुटुंब : अभिनेता ते नेता हा मोठा पल्ला गाठणारे कमल हासन यांना वेगळ्या ओळखीची काहीच गरज नाही. त्यांच्या दोन्ही मुली श्रुती आणि अक्षरा या दोघी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. श्रुती एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि गायिकादेखील आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया आणि इंडियन एक्सप्रेस)

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर