-
महानायक अमिताभ बच्चन हे आपल्या कामाबाबत किती निष्ठावान आहेत हे त्यांच्या कामातुन वारंवार सिद्ध झाले आहे. जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ काम करताना बिग बी यांनी प्रत्येक भूमिकेसाठी अपार मेहनत घेतली आहे. अशीच एक कहाणी आज आपण पाहणार आहोत.
-
अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा हा चित्रपट अगदी फ्लॉप झाला होता पण या सिनेमाचा एक किस्सा आजही ऐकणाऱ्यांना थक्क करून जातो.
-
बिग बी यांनी सांगितले की, या चित्रपटासाठी त्यांनी ७ दिवस आपले तोंड धुतले नव्हते. दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’ चित्रपटात अमिताभ यांना बिहारच्या अनवर अली या मुसलमान युवकाचे काम केले होते.
-
या सिनेमाचे शूटिंग गोव्यात झाले होते, व बजेट अगदी कमी होते. त्या काळात पंधरी जुकर हे एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट होते. अमिताभ यांचा मेकअप सुद्धा पंढरी करणार होते पण अचानक एका कामाच्या निमित्ताने ७ दिवस मुंबईला जावे लागले होते.
-
त्या काळात मेकअप आर्टिस्ट सुद्धा मोजकेच होते. त्यामुळे प्रत्येक मेकअप आर्टिस्टला एका एका लुकसाठी मेहनत घ्यावी लागत होते.
-
मेकअप आर्टिस्टने अमिताभला याबाबत सांगताच समोर काहीही पर्याय नसल्याने त्यांनी हा एकदा केलेलाच मेकअप ७ दिवस टिकवून ठेवण्याचे ठरवले. म्हणूनच त्यांनी सात दिवस तोंड धुतले नव्हते.
-
अमिताभ यांनी सांगितले की ६ दिवस ते चेहऱ्याला पाणीही लागू देत नव्हते. जेव्हा मेकअप आर्टिस्ट पंढरी पुन्हा आले तेव्हा ते अमिताभ यांना बघून थक्क झाले होते.
-
या लुकसाठी बिग बी यांनी दाढी लावली होती, त्याच मेकअपसह त्यांनी ६ दिवस जेवण- खाणे, झोपणे सगळं काही केलं होतं.
-
पंढरी यांनी अमिताभ यांना “तू खूप प्रगती करशील, तुझे कामावरचे प्रेम तुला एक दिवस सुपरस्टार बनवू शकेल” असे सांगितले होते

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावलं; कृषी काढून ‘क्रीडा’ दिलं!