-
करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे.
-
चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
-
नुकताच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला.
-
१ मिनिट १९ सेकंदाच्या या टीझरमध्ये आलिया भट्टच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
संपूर्ण टीझरमध्ये आलिया नेहमीपेक्षा एका वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.
-
चित्रपटात आलियाने सुंदर साड्या नेसल्याचे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
-
प्रत्येक साडीत आलिया अप्सरेप्रमाणे सुंदर दिसत आहे.
-
लाल, पिवळा, काळा, निळा अशा बहुरंगी रंगाच्या साड्या आलियाने नेसल्या आहेत.
-
आलियाचे साडीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
अभिनेत्री या चित्रपटात राणी चॅटर्जी ही भूमिका साकारणार आहे.
-
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे.
-
२८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला