-
मनोरंजन विश्व प्रत्येकालाच आपल्याकडे आकर्षित करत असते. हे जग जितके झगमगते वाटते, कलाकारांना तितकीच मेहनतही घ्यावी लागते.
-
सुरुवातीला चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना अनुसरून चित्रपटाची कथा ठरवली जात होती. मात्र आता चित्रपटाच्या कथेला अनुसरून कलाकार स्वतःला त्या पात्रात झोकून देतात.
-
असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःला पात्रामध्ये उतरवण्यासाठी अनेक सीमा ओलांडल्या आहेत.
-
आज आपण अशाच काही सर्वोत्कृष्ट कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपले पात्र सत्यात उतरवण्यासाठी जीवाचे रान केले आहे.
-
2016 साली प्रदर्शित झालेल्या ‘सरबजीत’ या चित्रपट रणदीप हुड्डाने चुकून भारत-पाकिस्तान सीमा ओलंडलेल्या आणि त्यानंतर पाकिस्तानमधील तुरुंगात कैद असलेल्या भारतीय व्यक्तीचे पात्र साकारले.
-
रणदीपचे या पात्रासाठी खूप कौतुक करण्यात आले. यासाठी कारणही तसेच खास आहे. रणदीपने या चित्रपटासाठी 28 दिवसांत तब्बल 18 किलो वजन कमी केले होते. इतकेच नाही तर या चित्रपटात वजन कमी केल्यामुळे रणदीपच्या आतड्याही स्पष्ट दिसत होत्या.
-
‘लुटेरा’ चित्रपटात रणवीर सिंगने त्याच्या पात्राची वेदना समजून घेण्यासाठी त्याच्या पोटात स्टेपलरची पिन मारली होती.
-
रणवीरने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, एका सीनमध्ये त्याला गोळी लागली आहे आणि त्याला वेदना होत असल्याचे दाखवले जाणार होते.
-
वास्तविक जीवनात, त्याला गोळी लागल्याची वेदना कधीच जाणवली नव्हती, म्हणून त्याने त्या वेदना जाणवून घेण्यासाठी आणि तो सीन शूट करण्यासाठी स्वतःच्या पोटात स्टेपलरची पिन मारली होती.
-
‘ट्रॅप्ड’ या चित्रपटासाठी राजकुमार राव अनेक दिवस उपाशी राहिला होता. चित्रपटातील आपली व्यक्तिरेखा खरी दिसावी यासाठी तो दिवसभर ब्लॅक कॉफी आणि दोन गाजर खात असे.
-
‘सोनचिड़िया’ चित्रपटासाठी भूमी पेडणेकरला वाळवंटी लोकेशनवर अनवाणी शुटिंग करावे लागले. याच्या तयारीसाठी भूमीने दोन महिने चप्पल घातली नव्हती. बाजारातही ती अनवाणीच जायची.
-
‘बाहुबली’ चित्रपटासाठी प्रभासने स्वतःला 600 दिवस घरात कैद केले. यादरम्यान त्याने कोणताही चित्रपट साइन केला नाही.

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली