-
एक उत्तम गायिका, कुशल सूत्रसंचालिका, गुणी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
स्वानंदीने होणाऱ्या पतीबरोबरचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.
-
त्या फोटोला स्वानंदीने ‘This is US #AmchaTharla’ असे कॅप्शन दिल होते.
-
तेव्हापासून स्वानंदीच्या लग्नाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
-
स्वानंदीच्या होणाऱ्या पतीचं नाव आशिष कुलकर्णी असे आहे.
-
आशिष हा एक उत्तम गायक आणि गीतकार आहे.
-
आता स्वानंदीने सोशल मीडियावर साखरपुड्याबद्दलची घोषणा केली आहे.
-
नुकताच स्वानंदीचा मेहंदी सोहळा पार पडला.
-
स्वानंदीच्या हातावर काढलेल्या मेहंदीची डिझाइनही खास आहे.
-
स्वानंदी हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर लिहून सुंदर डिझाइन काढण्यात आली आहे.
-
स्वानंदीच्या या मेहंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
#SwanandiAshish असा हॅशटॅगही तयार करण्यात आला आहे.
-
स्वानंदी ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच गायिका देखील आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी / इन्स्टाग्राम)
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल