-
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर.
-
मधुराणी प्रभुलकर ही या मालिकेत आई म्हणजे अरुंधती हे पात्र साकारत आहे.
-
मधुराणी प्रभुलकर ही हे पात्र उत्तमरीत्या निभावत आहे.
-
तिच्या या व्यक्तिरेखेवर प्रेक्षकही भरभरून प्रेम करीत आहेत.
-
मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांत मधुराणीने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
-
मधुराणी ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
-
नुकतंच तिने एका फोटोशूटचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
-
यात मधुराणीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर प्राजक्त फुलांची डिझाईन पाहायला मिळत आहे.
-
अनेकांनी तिला ही साडी कुठून घेतली, याची किंमत काय, असे प्रश्न विचारले आहेत.
-
मधुराणीची ही साडी अॅनजॉर(Anjor) या ब्रँडची आहे.
-
ही साडी कॉटन स्लिक या प्रकारातील असून त्याची किंमत २९०० रुपये इतकी आहे.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल