-
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत.
-
देशभरातच नव्हे तर, जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत.
-
चाहत्यांच्या मनावर त्यांनी आपली अमिट छाप सोडली आहे.
-
त्यांचा उत्साह आजच्या तरुणाईपेक्षा कमी नाही. बिग बींच्या व्यक्तिमत्त्वात असंख्य रंग आहेत.
-
त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
-
चित्रपटांबरोबरच अमिताभ बच्चन हे छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात.
-
बॉलिवूडचे महानायक ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात.
-
या कार्यक्रमाचा सद्या पंधरावा पर्व सुरु आहे.
-
कौन बनेगा करोडपती गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या अनेक पर्वाचे सूत्रसंचालन केलं आहे.
-
लोकांना या शोमधील अमिताभ बच्चन यांची प्रत्येक शैली खूप आवडते.
-
पण, तुम्हाला माहिती आहे का, अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी किती मानधन घेतात?
-
मिळालेल्या माहितीनुसार, २००० मध्ये हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी बिग बींनी प्रत्येक भागासाठी २५ लाखांची मागणी केली होती.
-
पहिला पर्व यशस्वी झाल्यानंतर अमिताभ यांनी मानधनात वाढ करुन १ कोटी केली होती.
-
या कार्यक्रमाच्या सहाव्या आणि सातव्या पर्वासाठी त्यांनी १.५ ते २ कोटी रुपये मानधन घेतले होते.
-
आठव्या पर्वासाठी त्यांनी २ कोटी रुपये मानधन घेतले होते. तर अमिताभ बच्चन यांनी नवव्या पर्वासाठी २.६ कोटी घेतले.
-
दहाव्या पर्वासाठी ३ कोटी, आणि अकराव्या बाराव्या, तेराव्या पर्वामध्ये ३.५ कोटी रुपये मानधन घेतले होते, तर चौदाव्या पर्वासाठी तब्बल ४ ते ५ कोटी रुपये घेतल्याचे बोललं जात आहे.
-
आता पंधराव्या पर्वात अमिताभ बच्चन किती रुपये मानधन घेताहेत हे गुपित आहे. लवकरच आकडा आपल्या सर्वांच्या समोर येईल. (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा