-
Entertainment Updates: सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. या गॅलरीच्या माध्यमातून पाहुयात कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
-
आज १ सप्टेंबर रोजी ‘लव-ऑल’ (Love-All) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-
अॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलर असा ‘मिस्ट्री ऑफ द टॅटू’ (Mystery of the Tattoo) हा चित्रपट आज १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
-
दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानचा ‘फ्रायडे नाईट प्लॅन’ (Friday Night Plan) हा चित्रपट आज ओटीटीवर प्रदर्शित झाला.
-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ (Jawan) हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ (Haddi) हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा ‘श्री’ (Sri) हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा ‘जाने जा’ (Jaane Jaan) हा थ्रिलर चित्रपट २१ सप्टेंबर २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family) हा बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ (Sukhee) हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) हा बहुचर्चित चित्रपट २८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा ‘सलार’ (Salaar) हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोशल मीडिया / इन्स्टाग्राम)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल