-
तब्बल दोन वर्षांनंतर तेजश्री प्रधान प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
आजपासून तिची नवकोरी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सुरू होतं आहे.
-
तेजश्री पुन्हा एकदा या मालिकेतून नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
-
या नव्या मालिकेच्या निमित्तानं ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर तेजश्रीचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले; ज्यामधून तिनं विविध प्रश्नांची उत्तर दिली आहे.
-
तेजश्रीनं ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवरील जवळच्या व्यक्ती कोण आहेत? याचा खुलासा केला आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवरील तेजश्रीची पहिली जवळची व्यक्ती म्हणजे तिच्या आई भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले.
-
त्यानंतर दुसरी जवळची व्यक्ती म्हणजे तेजश्रीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते योगेश केळकर.
-
तसेच सेटवरील तेजश्रीच्या तिसरी जवळची व्यक्ती म्हणजे मालिकेचा हिरो अभिनेता राज हंचनाळे.
-
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विरोधी स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात? दोघांमधील प्रेम कसं बहरत? हे पाहायला मिळणार आहे.

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”