-
मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार पावसाळ्यात विविध ठिकाणी फिरायला किंवा ट्रेक करण्यासाठी जातात.
-
अलीकडेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या भावासह पावसाळी ट्रेकला गेली होती.
-
ट्रेकसाठी अभिनेत्रीने मुंबईपासून साडेतीन तासांच्या अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटाची निवड केली होती.
-
“पुन्हा पाऊस पडू लागताच मी मान्सून ट्रेकला जायचं ठरवलं…सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या या रत्नांचा शोध घेण्यासाठी ( धबधबे )”, असं कॅप्शन अभिनेत्रीने ट्रेकच्या फोटोंना दिलं आहे.
-
सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा भाऊ अतुल कुलकर्णी आणि मनोरंजनसृष्टीतील तिचा जवळचा मित्र आशय कुलकर्णी दिसत आहेत.
-
अभिनेत्रीने ताम्हिणी घाट परिसरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुंदर धबधबे, निसर्गरम्य वातावरण, ताम्हिणी घाटाचं सौंदर्य अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
सोनालीने या पावसाळी ट्रेकचा संपूर्ण व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”