-
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुल सध्या तिच्या नव्या हॉटेलमुळे चांगलीच चर्चेत आहे.
-
अनघाने पुण्यातील डेक्कन परिसरात १९ ऑक्टोबरला ‘वदनी कवळ’ हे नवीन हॉटेल सुरू केलं.
-
हॉटेलमधील इंटिरियरचे खास फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अनघाने हॉटेल सजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचं हे फोटो पाहून लक्षात येतं.
-
अभिनेत्रीने हॉटेलमधील एका भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘वदनी कवळ घेता नाम घेता श्रीहरीचे…’ हा श्लोक लिहून घेतला आहे.
-
भगरे गुरुजींच्या लेकीने केळीच्या पानावर साकारलेली सुंदर नेमप्लेट आणि विठ्ठलाची देखणी मूर्ती हॉटेलमध्ये विशेष लक्ष वेधून घेते.
-
याशिवाय दुसऱ्या एका भिंतीवर अनघाने पुणे शहराचे जुने विंटेज फोटो लावले आहेत.
-
हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी अभिनेत्रीने पितळेची जुनी भांडी शोभेसाठी ठेवली आहेत. या भांड्यांमुळे तिच्या संपूर्ण हॉटेलला एक मराठमोळा लूक मिळाला आहे.
-
दरम्यान, अनघाने शेअर केलेल्या फोटोंवर सध्या नेटकऱ्यांसह मराठी कलाकारमंडळींकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल