-
‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच एक नवीन रिअॅलिटी शो सुरू करण्यात येणार आहे.
-
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी अर्थात प्रेक्षकांच्या लाडक्या राणादाने पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर कमबॅक केलं आहे.
-
‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना राणादाची झलक पाहायला मिळाली.
-
यापूर्वी ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये हार्दिक जोशीने मुख्य भूमिका साकारली होती.
-
आता या नव्या कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे हार्दिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
-
हार्दिक जोशीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडेच तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
-
आता झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करत राणादा ‘जाऊ बाई गावात’ या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
हा नवीन कार्यक्रम गावकडच्या पारंपरिक संस्कृतीवर आधारित असेल असं प्रोमो पाहून लक्षात येत आहे.
-
दरम्यान, ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून राणादाच्या कमबॅकमुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा