-
दिवाळीच्या मुहूर्तावर सध्या कलाकार मंडळी नवं घर आणि आलिशान गाड्या खरेदी करताना दिसत आहेत.
-
कलाकार मंडळी सोशल मीडियावर नव्या गाडीबरोबर किंवा घराचे फोटो शेअर करत आहेत.
-
सध्या ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी-दिघे यांनी खरेदी केलेल्या आलिशान गाडीची चांगलीच चर्चा सुरू आहे.
-
“नवीन सदस्याचं आमच्या घरी स्वागत आहे,” असं कॅप्शन लिहीत प्राजक्ता यांनी गाडीबरोबरचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
नव्या आलिशान गाडीचं कुटुंबात स्वागत करताना अभिनेत्रीबरोबर त्यांचे पती आणि मुलगाही उपस्थित होता.
-
पण प्राजक्ता यांनी खरेदी केलेल्या या आलिशान गाडीची किंमत माहितेय का?
-
प्राजक्ता यांनी मर्सिडीज बेंझ खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तब्बल ६० ते ७० लाखांपासून सुरू होते.
-
मराठी सिनेसृष्टीतील खूप कमी कलाकारांकडे एवढ्या किंमतीची आलिशान गाडी आहे.
-
पण आता आलिशान गाडी असणाऱ्या या यादीमध्ये प्राजक्ता कुलकर्णी-दिघे यांचं नाव ही सामील झालं आहे.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case