-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
‘अप्सरा’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली सोनाली अभिनयास तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही विशेष चर्चेत असते.
-
सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती तिच्या आयुष्यातील लहान-मोठ्या गोष्टी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतंच सोनालीने नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यात तिने गुलाबी रंगाचा वनपिस घातलेला आपण पाहू शकतो.
-
सोनालीने आपले आईबाबा आणि भावासह सुट्ट्यांचा आनंद घेतला. या सुट्ट्यांचे कारणही खास होते.
-
सोनालीने आपल्या आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खास गिफ्ट दिलं आहे.
-
सोनाली आपल्या संपूर्ण कुटुंबासह पाँडिचेरीला गेली आहे. याचे फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
चाहत्यांनी सोनालीच्या पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल