-
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जोडपं आहे. (फोटो : @girish_katkar_photography)
-
मागच्या वर्षी आजच्याच दिवशी या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांचं लग्न म्हणजे एकप्रकारे मोठा सोहळाच होता. (फोटो : @sevenvowstories)
-
या दोघांच्या लग्नाच्या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. (फोटो : @royalebysvs)
-
हार्दिक-अक्षयाच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विवाहसोहळ्यातील सुंदर फोटोंवर पुन्हा एकदा नजर टाकूया. (फोटो : @royalebysvs)
-
अक्षयाने मेहंदी सोहळ्यासाठी सुंदर पेहराव केला होता. यावेळी तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. (फोटो : @royalebysvs)
-
हळदीच्या कार्यक्रमासाठी हार्दिक आणि अक्षयाने पांढऱ्या रंगाचा पेहराव केला होता. (फोटो : @girish_katkar_photography)
-
यावेळी दोघेही कमळाच्या भांड्यात बसले होते. दोघे अतिशय सुंदर दिसत होते. (फोटो : @girish_katkar_photography)
-
संगीत सोहळ्यासाठी हार्दिक आणि अक्षयाने आकाशी रंगाचा पेहराव केला होता. (फोटो : @sevenvowstories)
-
यावेळी हार्दिकने आकाशी रंगाचा ब्लेझर सूट आणि अक्षयाने आकाशी रंगाचा गाऊन घातला होता. (फोटो : @sevenvowstories)
-
लग्नासाठी अक्षयाने लाल रंगाची नऊवारी आणि हार्दिकने तपकिरी रंगाचा सदरा आणि लाल रंगाचे धोतर घातले होते. (फोटो : @royalebysvs)
-
हार्दिकने अक्षयाला मंगळसूत्र घालतानाचे फोटो खूपच व्हायरल झाले होते. (फोटो : @girish_katkar_photography)
-
यावेळी हार्दिकने अक्षयाला किस करतानाचा फोटो चाहत्यांना खूपच आवडला होता. (फोटो : @girish_katkar_photography)
-
कमळाच्या फुलांची वरमाळा घालून हार्दिक-अक्षया खूपच सुंदर दिसत होते. (फोटो : @girish_katkar_photography)
-
लग्नाच्या रिसेप्शनला हार्दिक आणि अक्षयाने ग्रँड एन्ट्री घेतली. (फोटो : @royalebysvs)
-
यावेळी त्यांनी जांभळ्या रंगाचा मॅचिंग पेहराव केला होता. हार्दिकने जांभळ्या रंगाची शेरवाणी तर अक्षयाने जांभळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. (फोटो : @royalebysvs)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा