-
‘सुंदरा मनामध्ये भरली’ आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे राधा सागर.
-
राधा सागर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
दोन महिन्यांपूर्वीच राधाच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. ही गोड बातमी तिने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
-
आता राधाच्या बाळाचं थाटामाटात बारसं करण्यात आलं आहे. नामकरण सोहळ्यातील खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
राधाच्या बाळाच्या बारशाला जवळचे कुटंबीय, मित्र-मैत्रिणी व नातेवाईक उपस्थित होते.
-
यावेळी तिने पैठणीचा जांभळ्या रंगाचा सुंदर असा गाऊन ड्रेस परिधान केला होता.
-
बाळालाही आईला मॅचिंग असे कपडे घातले होते. दोघांच्या ट्विनिंग ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
राधा सागर आपल्या लेकाचं नाव काय ठेवणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती.
-
राधा सागरने तिच्या बाळाचं नाव ‘वीर’ असं ठेवलं आहे. ‘वीर’ या नावाचा अर्थ साहसी, योद्धा, सशक्त, धैर्यवान असा होतो.
-
दरम्यान, राधा सागरच्या लेकाच्या बारशातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photos: @iconicproductionphotography/Instagram)

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…