-
लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मधील सागर-मुक्ता अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. (फोटो सौजन्य – पीआर फोटो)
-
दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई. (फोटो सौजन्य – पीआर फोटो)
-
सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे. (फोटो सौजन्य – पीआर फोटो
-
गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही असणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. (फोटो सौजन्य- तेजश्री प्रधान फॅनपेज)
-
संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागर बरोबरच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत. (फोटो सौजन्य – जुई गडकरी इन्स्टाग्राम)
-
सागर-मुक्ताच्या लग्नासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली खास हजेरी लावणार आहेत. (फोटो सौजन्य- अमित भानुशाली इन्स्टाग्राम)
-
पण सागर-मुक्ताच्या साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळदीला अर्जुन-सायली का गैरहजर होते? याचं कारण समोर आलं आहे. (फोटो सौजन्य – जुई गडकरी इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वी अर्जुन-सायली म्हणजे अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरीने ‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सागर-मुक्ताच्या लग्नाच्या शूटिंगमध्ये केलेली धमाल आणि अनेक किस्से सांगितले. (फोटो सौजन्य- तेजश्री प्रधान फॅनपेज)
-
तसेच अर्जुन-सायलीने ते सागर-मुक्ताच्या साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळदीला का हजर राहू शकले नाही? हे देखील सांगितलं. (फोटो सौजन्य- तेजश्री प्रधान फॅनपेज)
-
सायली म्हणजे जुई गडकरी म्हणाली, “कारण आमच्याकडे तेव्हा माझा आणि अर्जुनचा वाढदिवस सुरू होता आणि वाढदिवस संपता संपता आम्हाला धिंगाणामधून कॉल आला. त्यांनी सांगितलं आमच्या इथे येऊन धिंगाणा घाला म्हणून आम्ही तिकडे गेलो.” (फोटो सौजन्य – जुई गडकरी इन्स्टाग्राम)
-
‘पण समजा तुम्ही असता तर कोणत्या गाण्यावर तुम्हाला डान्स करायला आवडलं असतं?,’ असं अर्जुन-सायलीला विचारण्यात आलं. (फोटो सौजन्य – जुई गडकरी इन्स्टाग्राम)
-
तेव्हा सायलीचं उत्तर देत म्हणाली, “आमचं गाणं ठरलं आहे. ‘तुला पाहता’, आमच्या शोमध्ये तेच लावतात आणि डान्स पण त्यावरच केला असता. कारण जवळ जवळ ते अर्जुन- सायलीचं गाणं झालंय इतकं वाजवतात.” (फोटो सौजन्य – जुई गडकरी इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”