-
पूजा सावंत, भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे आणि तिचा पती अभिषेक जावकर यांच्या मैत्रीची मराठी मनोरंजनसृष्टीत नेहमीच चर्चा असते.
-
ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हे सगळेजण खास गोव्याला गेले आहेत.
-
पूजाबरोबर तिची बहीण रुचिरा व भाऊ श्रेयस देखील गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
रुचिराने या गोवा ट्रिपचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
-
पूजा सावंत, भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे, अभिषेक जावकर, रुचिरा सावंत आणि तिचा भाऊ श्रेयस एकत्र या गोवा ट्रिपचा आनंद घेत असल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
पूजा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्यापूर्वी आपल्या जवळच्या मित्रमंडळींबरोबर ती गोव्याच्या किनाऱ्यावर धमाल मस्ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
पूजा, प्रार्थना व भूषण यांची अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे.
-
पूजाने या ट्रिपच्या फोटोंना ‘ख्रिसमस मॉर्निंग इन गोवा’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान, पूजाने शेअर केलेल्या गोवा ट्रिपच्या फोटोंवर सध्या चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत व रुचिरा सावंत इन्स्टाग्राम )

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”